परवाने
लर्नलाटेक् हे संकेतस्थळ दोन मुक्त परवाने वापरते:
सामग्री
ह्या संकेतस्थळाची सर्व सामग्री क्रिएटिव्ह कॉमन्स श्रेयनिर्देशन समवितरण आंतरराष्ट्रीय ४.० परवान्यांतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे. अर्थात ह्या सामग्रीचा वापर कोणीही कुठेही करू शकते, परंतु ह्या सामग्रीची निर्मिती ज्यांनी केली आहे त्यांचा श्रेयनिर्देश करणे आवश्यक आहे व त्याचे वितरणदेखील अशाच प्रकारे मुक्त ठेवणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी परवाना पाहा.
आज्ञावली
लाटेक् आज्ञावलीची उदाहरणे क्रिएटिव्ह कॉमन्स शून्य (कोणतेही अधिकार राखून ठेवलेले नाहीत.) ह्या परवान्यासह मुक्त आहेत. हा कायदेशीर मसुदा सार्वत्रिक सामग्री (पब्लिक डोमेन) ह्या प्रकारच्या सामग्रीचेच वर्णन करतो. त्याचा मुख्य अर्थ असा की ह्याचा वापर कोणत्याही अटींशिवाय कोणीही करू शकते. त्यांचा श्रेयनिर्देश करण्याची सक्ती नाही, तसेच त्यांचे वितरण मुक्त ठेवण्याचीही अट नाही.