प्रकरण १५

अडचणी

ह्या प्रकरणात लाटेक्-मध्ये येणाऱ्या अडचणी, त्यांचे अर्थ व त्या कशा सोडवाव्यात हे आपण पाहूया.

लाटेक् ही एक आज्ञावली आहे. तिच्या प्रक्रियेत वापरकर्त्यांकडून काही चुका होऊ शकतात व त्यांमुळे आज्ञावलीय विश्वात फार सहज आढळणाऱ्या अडचणींचा सामना लाटेक्-वापरकर्त्यांनाही करावा लागू शकतो.

सर्वसामान्य अडचणी

ह्या पृष्ठावर आपण सर्वसामान्य अडचणींबाबत माहिती घेऊया. प्रत्येक अडचण तिचे कारण काय आहे ह्याबाबत थोडी माहिती देते.

ह्यासाठी उदाहरणे चालवून पाहणे उपयुक्त ठरतेच, परंतु त्यांच्यातील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणेदेखील तितकेच महत्त्वाचे.

pdflatex not found

अनेकदा सुरुवातीला वापरकर्त्यांना दिसणारी अडचण -

'pdflatex' is not recognized as an internal or external command,
operable program or batch file.

ही विंडोज़् प्रणालीवर व

bash: pdflatex: command not found

ही लिनक्स प्रणालीवर.

ही लाटेक्-ची अडचण नसून कार्यकारी प्रणालीची अडचण आहे. ह्या अडचणीत असे सांगितले आहे की टेक् संगणकावर बसवले नाही अथवा ते मला सापडले नाही. वापरकर्त्यांकडून एक सामान्य चूक होते ती अशी की ते केवळ लाटेक्-चा संपादक संगणकावर बसवतात व टेक्-वितरण बसवतच नाहीत. त्यामुळे ही अडचण येऊ शकते.

टेक् अडचणीची चिकित्सा

\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}

\newcommand\mycommand{\textbold{hmmm}}

\begin{document}

My command is used here \mycommand.

\end{document}

This produces a multi-line message in the log file.

! Undefined control sequence.
\mycommand ->\textbold 
            {hmmm}
l.8 My command is used here \mycommand
                   .
? 

ह्याकडे विशेष लक्ष द्या की नवीन आज्ञेची व्याख्या करताना जर चूक घडली, तर टेक्-ला ती दिसत नाही. अशी चुकीची व्याख्या जर वापरली गेली, तरच ही चूक टेक-ला कळते. वास्तविक जर ही चुकीची आज्ञा दस्तऐवजात वापरलीच गेली नाही, तर टेक्-ची प्रक्रिया कोणत्याही अडचणींशिवाय पार पडते. त्यामुळे जरी अडचण ओळक्रमांक ७वर दाखवली जात असली, तरी आज्ञावलीतील चूक ओळक्रमांक ३वर आहे.

काही संपादक एका ओळीत अडचणींचा गोषवारा देण्याचा प्रयत्न करतात. उदा.

line 7: undefined command: ...\mycommand

हा गोषवारा दिशाभूलकारक ठरू शकतो, कारण \mycommand ह्या आज्ञेची व्याख्या खरे तर झाली आहे. अडचण त्या व्याख्येत आहे व हे कळण्यासाठी अडचणीतील संपूर्ण निरोप वाचणे आवश्यक ठरते.

कंसांची चुकीची जोडी

\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}

\usepackage[leqno}{amsmath}

\begin{document}

\end{document}

इथे चूक एका चौकटी कंसाला महिरपी कंसाने संपवणे ही आहे. एक अधिकचा महिरपी कंस लाटेक्-चालन अयशस्वी ठरवतो. दुर्दैवाने ह्यामुळे दाखवली जाणारी अडचण पुरेशी स्पष्ट नाही. त्याने नेमकी चूक कळत नाही.

! Argument of \@fileswith@ptions has an extra }.

अडचणीतील निरोप जरी पुरेसा स्पष्ट नसला, तरी ओळक्रमांक व नेमकी चुकीची जागा टेक् पुढील प्रकारे दाखवते व ते मात्र कारण समजून घेण्यास निश्चितच उपयुक्त ठरते. टेक्-ने कुठवर प्रक्रिया केली आहे व ते कुठे थांबले हे आपल्याला अशा प्रकारच्या अडचणींमुळे अचूक कळते.

l.4 \usepackage[leqno}
           {amsmath}

गहाळ धारिका

\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}

\usepackage{amsmathz}

\begin{document}

\end{document}

ह्या आज्ञावलीसह पुढील अडचण दाखवली जाते

! LaTeX Error: File `amsmathz.sty' not found.

ही अडचण दोन कारणांमुळे दाखवली जाऊ शकते.

दर्शनी गणितात मोकळ्या ओळी

\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}

\begin{document}

Some text
\begin{equation}

 1=2

\end{equation}

\end{document}

ह्यामुळे एक विचित्र अडचण दाखवली जाते.

! Missing $ inserted.

परंतु हिला सोडवणे वास्तविक खूप सोपे आहे. मोकळ्या ओळी गणितक्षेत्रात चालत नाहीत व त्या काढून टाकल्या पाहिजेत.

स्वाध्याय

वरील उदाहरणांतील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा.

काही चुका असलेली लहानसहान उदाहरणे तयार करा. त्यांना चालवल्यावर टेक् दाखवणाऱ्या अडचणींचे स्वरूप नोंदवून घ्या.