अंतर्गत संदर्भ
ह्या प्रकरणात लाटेक्-दस्तऐवजातील कोष्टक, आकृती, विभाग ह्यांसारख्या अनुक्रमित घटकांस अंतर्गत संदर्भ कसा पुरवावा हे आपण पाहणार आहोत.
जेव्हा एखाद्या दीर्घ दस्तऐवजाची अक्षरजुळणी केली जाते, तेव्हा त्यातील अनुक्रमित घटकांना संदर्भ देण्याची गरज पडू शकते. उदा. विभाग, आकृती, कोष्टक, मुद्दा. लाटेक्-मध्ये हे काम आपोआप करता येऊ शकते. त्याकरिता हाती आकडे लिहिण्याची गरज नाही. त्याकरिता काही गोष्टी कराव्या लागतात, त्या आता आपण पाहू.
\label
व \ref
ह्यांचे कार्य
लाटेक् आज्ञावलीत एखादी जागा लक्षात ठेवायची असेल, तर तिला \label
ह्या आज्ञेसह लक्षात ठेवावे लागते व इतरत्र संदर्भित करावे लागते. उदा.
\documentclass{article}
\usepackage[T1]{fontenc}
\begin{document}
Hey world!
This is a first document.
\section{Title of the first section}
Text of material for the first section.
\subsection{Subsection of the first section}
\label{subsec:labelone}
Text of material for the first subsection.
\begin{equation}
e^{i\pi}+1 = 0
\label{eq:labeltwo}
\end{equation}
In subsection~\ref{subsec:labelone} is equation~\ref{eq:labeltwo}.
\end{document}
ह्या उदाहरणात दोन \label{...}
आज्ञा आहेत. एक उपविभागानंतर व दुसरी equation
ह्या क्षेत्रात. ह्या दोन्ही जागा शेवटच्या वाक्यात \ref{...}
आज्ञांनी संदर्भित केल्या गेल्या आहेत. जेव्हा लाटेक् चालवले जाते, तेव्हा अशा टप्प्यांबाबतची माहिती साहाय्यक धारिकेत साठवली जाते. \label{subsec:labelone}
ही आज्ञा जिथे आली आहे त्या टप्प्यावर लाटेक् हे जाणतो की सध्या एक उपविभाग चालू आहे व त्यामुळे तो उपविभागाचा क्रमांक लक्षात ठेवतो.
\label{eq:labeltwo}
ही आज्ञा जिथे आली आहे त्या टप्प्यावर लाटेक् हे जाणतो की तिथे चालू व सयुक्तिक असे क्षेत्र equation हे आहे. त्यामुळे तो समीकरणाचा क्रमांक लक्षात ठेवतो. जेव्हा \ref{...}
ही आज्ञा वापरली जाते, तेव्हा साहाय्यक धारिकेतून क्रमांक मिळवले जातात.
subsec:
व eq:
ह्या भागाला लाटेक् आज्ञावलीत कोणताही अर्थ नाही, इथे काहीही लिहिले जाऊ शकते. (देवनागरीतसुद्धा लिहिता येऊ शकते!) परंतु अशा प्रकारे आज्ञावली पारदर्शक ठेवणे आज्ञावलिकारास उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे आपण वापरलेली नावे सहज लक्षात राहू शकतात.
फलितात काही वेळा संदर्भांऐवजी ठळक ठशातली दोन प्रश्नचिन्हे (??) दिसू शकतात. त्यांचे कारण असे की लाटेक् एकदाच चालवले गेले आहे व अजून संदर्भक्रमांक आज्ञावलीमार्फत लक्षात ठेवले गेले नाहीत. लाटेक् पुन्हा एकदा चालवले की ही अडचण सुटते. (बहुतांश वेळा निरनिराळ्या कारणांमुळे लाटेक् एकाहून अधिक वेळा चालवावेच लागते, त्यामुळे प्रत्यक्षात ही काही फार मोठी अडचण नाही.)
subsection व त्याचा क्रमांक ह्यांमध्ये एक ~
असे चिन्ह दिसू तुम्हाला दिसू शकते. हे चिन्ह ह्या दोन घटकांमध्ये ओळ तुटू नये म्हणून वापरले जाते.
\label
ही आज्ञा कुठे वापरावी?
\label
ही आज्ञा कायमच मागच्या अनुक्रमित घटकाचा क्रमांक लक्षात ठेवते. अनुक्रमित घटकांत विभाग, समीकरणे, मुद्दे, आकृत्या हे समाविष्ट आहेत. त्यामुळे ज्या घटकाचा अंतर्गत संदर्भ द्यायचा असतो त्याच्यानंतर ही आज्ञा लिहावी. त्यामुळे जेव्हा तुम्ही तरंगती दृश्यके वापरता तेव्हा त्यांच्या पोटातील \caption
ह्या आज्ञेनंतर अथवा तिच्या पोटात लिहावी \label
आज्ञा लिहावी.
स्वाध्याय
वरील चाचणी आज्ञावलीत नवीन अनुक्रमित घटक वाढवून पाहा. (उदा. विभाग, उपविभाग, अनुक्रमित याद्या इत्यादी) फलित योग्य दिसण्यासाठी लाटेक् किती वेळा चालवावे लागते हे पाहा.
काही तरंगती दृश्यके वापरून पाहा. \label
ही आज्ञा \caption
आज्ञेच्या नंतर न लिहिता आधी लिहिल्याने फलितात काय फरक पडतो ते पाहा.
जर \label
ही आज्ञा \end{equation}
नंतर लिहिली गेली तर काय फरक पडतो ते पाहा.